Wednesday, April 21, 2021

कोरोनाचे नवीन लक्षणे आणि हेल्पलाइन नंबर

कोरोनाची‌ लक्षण आढळल्यानंतर घाबरून न जाता हे पावलं  उचलणं गरजेचं आहे.


कोरोनाचा पॉझिटिव्ह आल्यानंतर तुमची लक्षणं कोणती आहेत,  HRCT Score किती आहे ,किती गंभीर आहेत, हे पाहून त्यानुसार पुढचे निर्णय डॉक्टर घेतात.

कोरोना व्हायरसचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर भीती वाटणं हे स्वाभाविक आहे. 

हेल्पलाईनला संपर्क करा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर आपण देशातल्या सगळ्या लोकांसाठी असलेल्या कोव्हिड-19 हेल्पलाईनला प्रथम संपर्क करा.

या राष्ट्रीय हेल्पलाईनचा नंबर आहे +91-11-23978046 (मोबाईलवरून लावताना 011 डायल करावा). या नंबरवर फोन केल्यानंतर काय करायचं याची माहिती पुढे आहे.


ही कोरोनाची लक्षणं आढळल्यानंतर पुढे काय करायचं, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तत्पूर्वी, आपण कोरोनाची नेमकी कोणती लक्षणे ते बघु.

वास न येणं किंवा चव न करणं हे सुद्धा कोरोनाचं लक्षण असू शकतं, त्याविषयी तुम्ही इथं आणखी वाचू शकता - वास न येणे,  चव न कळणे

कोरोनाच्या नवीन लक्षणांबाबत बघु

कोरोना व्हायरसची बाधा झाल्यानंतर किंवा कोव्हिड-19 चा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या लक्षणांमध्ये आता वाढ झाली आहे. अमेरिकेतल्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने आणि WHO ने कोरोनाच्या जुन्या लक्षणांसह नव्या लक्षणांची यादीही जाहीर केली आहे.

कोरोना व्हायरस थेट तुमच्या फुप्फुसांवर हल्ला करतो. यामुळे तुमच्या दोनपैकी एक लक्षण दिसू लागतं - एक तर ताप किंवा कोरडा खोकला. श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.

मात्र हा खोकला काही थांबत नाही. असंही होऊ शकतो की तुम्ही तासन् तास खोकतच आहात, किंवा दिवसांतून तीन-चार वेळा सातत्याने खोकत आहात. तुमच्या नेहमीच्या खोकल्यापेक्षा हे जास्त गंभीर वाटू शकतं.

कोरोनाची नवी लक्षणं कोणती?

ताप किंवा थंडी वाजणे, थरथरणे, स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, खोकला किंवा घसा खवखवणे, चव न कळणे किंवा वास न येणे, थकवा येणे ही कोरोनाची लक्षणं आहेत. पूर्वी ही लक्षणांची यादी फक्त फक्त ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास, एवढीच होत

WHO ने त्यांच्या वेबसाईटवर कोरोना व्हायरसमुळे जाणवणाऱ्या 13 लक्षणांची यादी दिली आहे. यातली सर्वसामान्य लक्षणं आपण याआधी वर पाहिली आहेत. पण, आता जगभरातल्या काही रुग्णांमध्ये पुढे दिसून आलेली लक्षणं ही नविन आहेत. कंजंक्टीवायटीस (डोळे येणे), त्वचेवर लाल चट्टे, पुरळ उठणे, हातापायांच्या बोटांवर, तळव्यांवर चट्टे उठणे, अतिसार किंवा हगवण लागणे, अंगदुखी, गंभीर लक्षणं, छाती दुखणे, छातीवर दबाव आल्यासारखं वाटणे, वाचा जाणे, शरीराची हालचाल थांबणे ही लक्षणं कोरोनाबाधितांमध्ये दिसून येतात.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC)नुसार थंडी वा हुडहुडी भरणं, कणकण जाणवणं, स्नायूदुखी आणि घसा खवखवणं ही देखील कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची लक्षणं असू शकतात.

ONSने नुकत्याच केलेल्या एका पाहणीनुसार कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये जुन्या व्हेरियंटच्या संसर्गाच्या तुलनेत खोकला आणि घसा खवखवणं, थकवा आणि स्नायूदुखी जास्त तीव्रपणे जाणवते.

ही लक्षणं दिसल्यावर काय कराल?

वरील लक्षणं आपल्यात दिसून आल्यांतर आणि कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर लगेच घाबरून जाण्याचं काही कारण नाही. असं झाल्यानंतर लगेच आपल्याला काहीतरी होईल या भीतीने घाबरून जाणं टाळायला हवं.

तुम्हाला दिसत असलेल्या वरच्या कोणत्याही लक्षणाची गंभीरता आधी पाहा. जर, अगदीच असह्य होत असेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जा. पण, फार गंभीर लक्षणं नसतील तर विचार करून न घाबरता कुटुंबीयांच्या सल्ल्याने पुढची पावलं टाका.

कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर पुढील 10 मुद्यांच्या आधारे तुम्ही योग्य ती पावलं टाकू शकता...

1) रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर आपण देशातल्या सगळ्या लोकांसाठी असलेल्या कोव्हिड-19 हेल्पलाईनला प्रथम संपर्क करा. या राष्ट्रीय हेल्पलाईनचा नंबर आहे +91-11-23978046 (मोबाईलवरून लावताना 011 डायल करावा). या हेल्पलाईनवर कॉल केल्यावर आपण आपला रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती द्यावी. ते आपली माहिती लिहून घेतात आणि आपल्याला आपण देशातल्या ज्या जिल्ह्यांत, तालुक्यात राहतो तिथल्या जिल्हा आरोग्य कार्यालयाशी जोडून देतात. जोडून देताना फोन लागला नाही, तर तिथला नंबर आपल्याला देतात.

तसंच, जर तुमची परिस्थिती गंभीर असेल तर ते आपण असलेल्या जिल्ह्याच्या कोव्हिड अतिदक्षता केंद्राला जोडून देतात. या जोडून दिलेल्या नंबरवर आपण आपली माहिती दिली की आपल्याला कुठे आणि कसे उपचार मिळतील किंवा कुठे अॅडमीट व्हावं लागेल याची माहिती लगेच दिली जाते. तसेच त्या आरोग्य केंद्राकडेही आपली नोंद होते आणि त्यांच्याकडूनही आपल्याला फोन येऊ शकतो. बीबीसी मराठीने स्वतः या नंबरवर फोन करून ही माहिती मिळवलेली आहे.

2) वरचा हेल्पलाईन नंबर हा राष्ट्रीय असून आपण राज्यासाठीच्या असलेल्या या हेल्पलाईन नंबरवर 020-26127394 कॉल करू शकता. दोन्ही पैकी कोणत्याही एका नंबरवर फोन केला तरी आपल्याला मदत मिळेल.

3) केंद्र सरकारने एक व्हॉट्सअप चॅटबॉटही तयार केला असून तो आपल्याला आपल्या प्रश्नांची थेट उत्तरं देतो. हा व्हॉट्सअप चॅटबॉट MyGov Corona Helpdesk आहे. +91 90131 51515 या नंबरवर आपण टेक्स्ट मेसेज पाठवून त्यावरचं उत्तर मिळवू शकता.

No comments:

Post a Comment