Saturday, June 30, 2018

पावसाळ्याची भटकंती

    
     पावसाळ्याची भटकंती 

       रिपरिप म्हणा वा रिमझिम म्हणा.. पाऊस पडला की मन मोहरतेच. अशात चिंबचिंब भिजायला आवडते. कधी ग्रुपमध्ये, कधी दोघांनाच तर कधी एकटेच मात्र भिजायचे असते. ओले व्हायचे असते. महाराष्ट्रासारख्या विस्तीर्ण पसरलेल्या राकट देशा.. दगडाच्या देशानेही हे पावसाचे मोहरणे आपल्या काळजात हलकेच नोंदले आहे. महाराष्ट्रात पावसाळी पर्यटन स्थळे तुमची वाट पाहत आहेत.
पावसाळा सुरु झाला की, अवघ्या महाराष्ट्राला आठवण होते ती माळशेज घाटाची. आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळाळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकरणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मध्येच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर अहमदनगर-कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे.
माळशेज घाट
पुण्याहून 120 किमी.अंतरावर व मुंबईपासून 127 किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग 222 वरील हा घाट आहे. पुण्याहून नारायणगावमार्गे माळशेज घाटात जाता येते. मुंबईहून कल्याणमार्गे देखील माळशेज घाटात जाता येते. तसेच या माळशेज घाटाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील परदेशी पाहुणे फ्लेमिंगो पक्षी, ससा, घोरपड, मुंगुस, बिबळ्या प्राण्यांचे वास्तव्य. पावसाच्या सरींसोबतच प्राण्यांची साथ यामुळे तुमच्या आनंदात भर पडते.

माळशेज घाटात राहण्याची सोयदेखील उपलब्ध आहे. कल्याण-माळशेज रस्त्यावर घाटाच्या पायथ्याशी सावर्णे गावात रस्ता संपतो तेथेच हॉलिडे रिसॉर्ट उपलब्ध आहे. हॉटेलवर गाडी उभी करुन शिदवी गावापर्यंत 3 किमी कच्च्या रस्त्याने चालत जावे लागते. स्थानिक वाटाड्याबरोबर असेल तर धबधब्यापर्यंत एक दिवसाची सहल म्हणून तुम्ही पावसाळ्यामध्ये धम्माल करण्यासाठी माळशेज घाटात जाऊ शकता.
ठोसेघर धबधबा
पावसाच्या थेंबासोबतच निसर्गाची साथ, दाट हिरवळ आजूबाजूला पसरलेले दाट धुके, चिंब भिजण्यासाठी, पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी, तुमच्यासाठी अप्रतिम ठिकाण ठरु शकते. सातारा शहरापासून 20 किमी अंतरावर असणारा ठोसेघर धबधबा. तुम्हाला अविस्मरणीय अनुभव देणारा आहे. अंगावर कोसळणारे तुषार आणि वातावरणातील गारवा मन अगदी चिंबचिंब करतात. त्याबरोबरच मित्रमैत्रिणींची सोबत मजा-मस्ती आनंद द्विगुणित करते. पावला-पावलावर 15 ते 20 मीटर उंचीचे लहान- मोठे धबधबे डोळ्यांचे पारणे फेडतात. पावसाची सर, अंगावर कोसळणारे धबधबे, पक्ष्यांचे मधुर आवाज, रंगीबेरंगी फुलपाखरे, गर्द झाडी तुमच्या मनाला तजेला देतात. तुम्हाला मनमोकळा श्र्वास घेण्यास सांगतात. या धकाधकीच्या/धावपळीच्या जीवनातून थोडावेळ निसर्गाच्या सान्निध्यात नक्की या… मुंबईपासून 280 किमी अंतरावर ठोसेघर गाव आहे.
भंडारदरा
भंडारदरा 300 फूट उंचीचे थंड हवेचे ठिकाण आहे. भंडारदरा येथे धरणांचा संच आहे. सोबतच धबधबे व सुंदर निसर्गरम्य हिरवळ आहे. शिर्डीच्या मार्गाने जर प्रवास करत असाल तर शांततामय ठिकाण व घराबाहेर खेळण्यासाठी भंडारदरा याची निवड करु शकता. मुंबईपासून 180 किमी व पुण्यापासून 80 किमी अंतरावर हे ठिकाण आहे.
लोणावळा-खंडाळा
सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींनी भरगच्च भरलेले डोंगरमाथे, दऱ्या, पावसाळ्यात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सर्व मनाला खूप सुखद वाटते. तसेच लोणावळा खंडाळ्याच्या जवळपास पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. राजमाची पॉईंट, वळवण धरण, भुशीधरण, कार्ला, भाजा येथील लेणी, लोहगडही पर्यटन स्थळे आहेत. मुंबईपासून 82 किमी अंतरावर लोणावळा आहे.
सोबतच सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणारा अजिंक्यतारा गड सातारा शहराला ऐतिहासिक ओळख देणारा आहे. प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्यतारा उभारलेला आहे. अजिंक्यताऱ्याची उंची 300 मीटर असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार 600 मीटर आहे. सज्जनगडावर दोन बुरुज व डावीकडे प्रसारभारती केंद्राचे टॉवर बघण्याजोगे आहेत. संपूर्ण गड बघण्यासाठी किमान दीड तास लागतो.
विदर्भ –मराठवाडा
मुक्तागिरी मेळघाटाच्या पायथ्याशी गुल्लर घाटरस्त्यावर सूर्य धबधबा, यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंडाचा धबधबा असो किंवा गोंदिया जिल्ह्यातील ढासगड किंवा दरेकसाजवळील हाजरा फॉल पर्यटकांना खुणावत असतो. सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत वसलेला चिचाटीचा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. धरणी तालुक्यातील रानिगावाचा कंजोली धबधबाही तुमची वाट पाहतोय. मराठवाड्यातील पावसाळी पर्यटन स्थळामध्ये औरंगाबादमधील कैलास मंदिर (एलोरा लेणी) तसेच अजिंठा लेणी व पाणचक्की यांचा समावेश आहे. तसेच नांदेडमधील कंधार किल्ला, तुळजा भवानी मंदिर, धाराशिव लेणी या भागातही पावसाळ्यात पर्यटनाला वाव आहे.
चिखलदरा
विदर्भातील काश्मीर म्हणून ओळखले जाणारे चिखलदरा हे सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. 

आंबोली



                          आंबोली 

                     महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणची राणी असं आंबोलीला म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. जगप्रसिद्ध जैववैविध्य असलेले निसर्गरम्य ठिकाण अशी आंबोलीची आता ख्याती झालेली आहे. शांत आणि निसर्गरम्य अशा आंबोलीच्या परिसरात नैसर्गिक साधनसंपत्तीची भरभराट पाहायला मिळते. सह्याद्रीच्या ऐन कण्यावर वसलेले आंबोली पूर्वीपासूनच सावंतवाडी संस्थानचे थंड हवेचे ठिकाण होते. पर्यटकांनी आवर्जुन वर्षातल्या कोणत्याही ऋतूमध्ये भेट द्यावे असे हे ठिकाण आहे. उंचावरून पडणारे धबधबे आंबोलीच्या सौंदर्यात अजूनच भर घालत असतात.
समुद्रसपाटीपासून 690 मीटर उंचावर असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे सुंदर आणि रमणीय ठिकाण आहे. सगळा परिसर हा अगदी घनदाट अरण्याचा आहे आणि तिथे आपल्याला बरेच धबधबे पाहायला मिळतात. वर्षाऋतू मध्ये होणारा प्रचंड पाऊस इथल्या सगळ्या डोंगरांना हिरवागर्द शालू नेसवतो. साहजिकच इंग्रज राज्यकर्ते या ठिकाणाच्या प्रेमात पडले आणि कर्नल वेस्ट्रॉप यांनी आंबोलीला गिरिस्थानाचा दर्जा मिळण्यासाठी खूपच मेहनत घेतली. हिवाळ्यात सगळा परिसर हा धुक्याची दुलई पांघरून बसलेला असतो आणि उंचावरून कोसळणारे धबधबे आपल्या डोळ्याचे पारणे फेडतात.
नागरतास धबधबा, हिरण्यकेशी, सी व्ह्यू पॉईंट, महादेवगड ही ठिकाणे पर्यटकांनी कायमच गजबजलेली असतात. कावळेसाद पॉईंट वरून तर सह्याद्रीच्या अजस्त्र रंगांचे भेदक दर्शन होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहासह इतरही अनेक हॉटेल्स इथे उपलब्ध असून राहण्याबरोबरच खाण्याची सोय सुद्धा फार छान केलेली आहे.
ऐन पावसाळ्यामध्ये आंबोलीला भेट देण्यासारखी दुसरी मजा नाही. संपूर्ण परिसर अगदी दिवसभर धुक्यात लपेटलेला असतो. निसर्गाचा स्पर्श आपल्या मनाला अगदी मोहवून टाकतो आणि एक प्रकारची मनःशांती सहजच लाभते. हिरण्यकेशी नदीचा उगम हा खूप निसर्गसंपन्न आहे. तिथपर्यंत जाण्याचा रस्ता काहीसा कच्चा आहे पण तिथे गेल्यावर दिसणारे निसर्गाचे रूप केवळ अवर्णनीय. तिथे पार्वतीचे एक छोटेसे देऊळ असून हिरण्यकेशी नदी इथल्याच डोंगरातून उगम पावते. तासनतास इथे बसून रहावेसे वाटते. हिरण्यकेशी नदी इथून पुढे कर्नाटकातून वाहत जाते आणि तिथे तिला घटप्रभा हे नाव मिळाले आहे.
वनस्पती, फुले, फळे आणि प्राणिजीवन यांनी आंबोली अगदी समृद्ध आहे. रानडुकरे, बिबटे, चितळ, सांबर, भेकर, अस्वल, माकडं असं वन्यजीवन इथे दिसू शकते. सदाहरित जंगलात मैना, बुलबुल, धनेश, धोबी, चांदोल, राघू असे पक्षीसुद्धा मोठ्या संख्येने आहेत. हिरडा, जांभूळ, ऐन, अंजन, करवंद, तमालपत्र, शिकेकाई यांची दाट झाडी इथे आहे आणि त्याचबरोबर शेकडो रानफुले, नेची आणि अनेक आमरी यांचेही दर्शन सहज होते.
मुंबईपासून 492 किलोमिटरवर असलेल्या आंबोली येथे जाण्यासाठी पुणे, मुंबई, बेळगाव, कोल्हापूर इथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत.

Friday, June 29, 2018

लोणार सरोवर

        
                लोणार  सरोवर 

       
                        बुलढाणा जिल्हा अजिंठा आणि सातपुडा पर्वताच्या कुशीत नयनरम्य नैसर्गिक सौंदर्याच्या कृपाछायेत विदर्भाच्या पश्चिम अंगाला विसावला आहे. विदर्भाचे महाद्वार म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. राजमाता जिजाऊ माँ साहेबांचे माहेर आणि छत्रपती शिवरायांचे आजोळ असल्याने हा जिल्हा महाराष्ट्राचे मातृकुल म्हणून सुपरिचित आहे. आंतरराष्ट्रीय भूगर्भ शास्त्रज्ञांचे आकर्षण ठरलेले आणि जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर याच जिल्ह्यात आहे.
ऐतिहासिक, पौराणिक, आध्यात्मिक, साहित्यिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला हा जिल्हा मराठी मनाचा आणि अस्मितेचा मानबिंदूच होय. आपण जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती घेऊ...पर्यटन स्थळे -लोणार- वैशिष्ट्य खाऱ्या पाण्याच्या विस्तीर्ण व नैसर्गिक सरोवराने बुलढाणा जिल्ह्यास आंतरराष्ट्रीय किर्ती मिळवून दिली आहे. 30 ते 50 हजार वर्षांपूर्वी झालेल्या अशनी पातामुळे सुमारे पावणे दोन किलोमीटर व्यासाचे आणि 10 ते 11 कि. मी. परिघाचे एक प्रचंड विवर तयार झाले आहे. लोणारचा उल्काघाती खळगा हा जगातील ज्ञात विवरामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा असून बेसॉल्ट खडकात निर्माण झालेले जगातील एकमेव विवर आहे. लोणारच्या सरोवराची प्राचीन साहित्यात पंचाप्सर सरोवर किंवा विराजतिर्थ या नावाने दखल घेतलेली आढळते. या सरोवराचा आणि परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने योजना आखली आहे.
पौराणिक आख्यायिकेनुसार ‘लवणासुर’ नावाच्या राक्षसाला विष्णूने मारले. त्याच्या नावावरूनच या सरोवरास व या परिसरास ‘लोणार’ नाव मिळाले. सरोवराच्या परिसरात दाट जंगल आहे. या जंगलात विविध पक्षी, माकडे, साप, सरडे, मुंगूस, कोल्हा, हरिण इत्यादी प्राणी पाहावयास मिळतात. येथील जंगलातील जैववैविध्य वाखाणण्याजोगे आहे.
सुविधा
लोणार येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवास संकुल आहे. तसेच खाजगी हॉटेल्सही आहेत. लोणार सरोवर शहरापासून 2.5 किलोमीटर अंतरावर आहे.

Friday, June 22, 2018

५२ दरवाजाचे शहर : औरंगाबाद

             

                  ५२ दरवाजाचे शहर:                                औरंगाबाद 

                 आशिया खंडातील 400 वर्षांत सर्वात जास्त वेगाने वाढलेले 52 दरवाजांचे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. यातच औरंगाबाद हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आल्याने सर्व स्तरावर पायाभूत सुविधा मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तुकलेचा, शिल्पकलेचा वारसा आणि विविध प्रकारच्या वन आणि वन्यजीवांचा सहवास लाभलेला, शैक्षणिक चळवळींनी गाजलेला जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा होय.
जागतिक पातळीवर प्रसिद्ध पावलेले आणि युनेस्कोच्या जागतिक हेरिटेज वास्तूमध्ये समाविष्ट असलेली अजिंठा लेणी, यादव आणि मुघलकालीन इतिहासात गाजलेला दौलताबाद किल्ला आणि बिबी का मकबरा म्हणजे औरंगाबादचे भूषणच. औरंगाबाद शहराच्या विकासाची मुर्हूतमेढ रोवणाऱ्या मलिक अंबरचा सोनेरी महल, पाण्याच्या नियोजनासाठी बांधलेल्या नहरी यांचा उत्तम नमुना असलेली पाणचक्की, शहराच्या डोंगरमाथ्यावरील बौद्ध लेण्या आणि निसर्गरम्य परिसरात वसलेले तसेच अनेक शैक्षणिक चळवळींनी गाजलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी स्थळे ही पर्यटकांसाठी अभुतपूर्व अनुभव देणारी आहेत.खाम नदीच्या तीरावर वसलेल्या औरंगाबाद शहराचे पूर्वी मलिक अंबरने फतेहपूर असे नामकरण केले होते. मुघल बादशहा औरंगजेबच्या नावावरुन शहराचे नाव औरंगाबाद ठेवण्यात आले. पैठणी साडी आणि हिमरु शालींसाठी प्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पाहूया.अजिंठा औरंगाबाद शहरापासून 110 कि.मी. अंतरावर असलेल्या फर्दापूर गावाजवळ सातमाळाच्या डोंगर रांगात कोरलेली अजिंठा लेणी अत्यंत देखणी आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव आहे.प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रयस्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. कालांतराने तिचे रूपांतर एका नितांत सुंदर अशा चित्रकला व शिल्पकला दालनात झाले. मात्र या लेण्यांची मूळ रचना एखाद्या धार्मिक शिक्षण संस्थेसारखी आहे. अजिंठा लेण्या भगवान गौतम बुद्धांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनाची कथा दर्शवितात. तसेच संपूर्ण जगामध्ये कोणत्याही शिल्पामध्ये रंग भरलेले एकमेव उदाहरण म्हणजे अजिंठा लेणी आहे. येथे देश-विदेशातील पर्यटकांची रेलचेल असते.
अजिंठा व्ह्यू पाँईट येथे एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. लेणी पाहण्यासाठी संपूर्ण दिवस लागत असल्यामुळे पर्यटकांनी सकाळच्या वेळी पाहण्यास सुरुवात करणे योग्य.
अजिंठा येथे जाण्यासाठी बस, मोटारगाडीने जाण्याची सुविधा आहे.वेरु औरंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 23 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत, दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे. हैदराबादच्या निजाम राजवटीनंतर या इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती. मात्र इ.स. 1951 साली भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असलेल्या वेरुळ लेण्यामध्ये हिंदू, जैन आणि बुद्ध अशा तिन्ही धर्माचे शिल्प कोरलेले आहे. अशी ही लेणी देशतील एकमेव लेणी आहे.
पितळखोरा
औरंगाबाद-चाळीसगाव रस्त्यावर कन्नड गावाजवळ एका दरीत हा 13 लेण्यांचा समूह आहे. भारतामधील या सर्वात जुन्या लेण्या आहेत. इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकातील या बौद्ध लेण्यात सुंदर शिल्पे व रंगीत भित्तिचित्रे आहेत. लेण्यांच्या पायथ्याशी भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांचे पाटण आहे. तेथील शिवमंदिरात प्रेक्षणीय कलाकुसर आहे. कन्नड येथील मारुती मंदिरात राहूचे मस्तक आकाशात ठोकरणाऱ्या विष्णू भगवंतांची मूर्ती आहे.
कसे जाल- येथे जाण्यासाठी औरंगाबाद येथून बस, मोटारगाडीची सुविधा आहे.
गौताळा अभयारण्य
हे अभयारण्य मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य होय. औरंगाबाद शहरापासून 75 कि.मी.अंतरावर, कन्नडपासून 5 कि.मी. अंतरावर तर चाळीसगावपासून 20 कि.मी.अंतरावर आहे. औरंगाबाद आणि धुळे यांना जोडणारा राज्य महामार्ग क्र.211 या अभयारण्यातूनच जातो.
कन्नडजवळच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अनेक प्रकारची झाडे, फुलझाडे दिसतात. पुढे गेल्यानंतर चंदनाच्या वनामधून वाहणारा एक नाला दिसतो त्याला चंदन नाला म्हणतात. याच्या काठाला मोर, पोपट असे रंगीबेरंगी पक्षी दिसतात. त्याचप्रमाणे सातभाई, सुगरण, दयाळ, बुलबुल, कोतवाल आणि चंडोल पक्षी दिसतात. पुढे एक मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर गौताळा तलाव आहे. या तलावाचा सारा परिसर गवताळ आहे. याठिकाणी पूर्वी गवळी लोक रहायचे. त्यांच्या गायी या परिसरात चरायच्या. त्यावरून या तलावाला गौताळा हे नाव पडले आणि हेच नाव पुढे अभयारण्यालाही देण्यात आले.
गौताळा तळ्याभोवती बांबू, पळस, रानपिंपळ, रान

Wednesday, June 20, 2018

हडप्पा संस्कृती

                      हडप्पा संस्कृती

                               हडप्पा संस्कृती ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पूर्व २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो. इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात. उत्खननात हडप्पा व मोहनजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या. अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात कालीबंगन, धोळावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले.

नगररचना :

        हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, धान्याची कोठारे, जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते. प्राचीन इजिप्त व मेसोपोटेमिया या समकालीन संस्कृतींच्या अगदी विरुद्ध हडप्पामध्ये कोणतीही भव्य मंदिरे किंवा तत्सम बांधकामे नव्हती. हडप्पाकालीन नगराची विभागणी प्रशासकीय इमारती व लोकवस्ती अशा दोन घटकांत करण्यात आलेली होती. शहराच्या लोकवस्तीचा भाग बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे किंवा जाळीप्रमाणे विविध प्रभागांमध्ये विभागला होता. नगर बांधणीसाठीच्या विटा ४:२:१(लांबी:रुंदी:उंची) या प्रमाणातच असत.

सौंदर्यप्रसाधने :

        हडप्पाकालीन संस्कृतीच्या उत्खननात एक शृंगारपेटी मिळाली. यामध्ये ब्राॅन्झचे आरसे, हस्तिदंती कंगवे, केसासाठी आकडे, पिना, ओठ व भुवया रंगवण्यासाठी लागणाऱ्या विविध रंगाच्या कांड्या मिळाल्या. हडप्पाकालीन लोकांना सौंदर्यप्रसाधनांप्रमाणेच अलंकाराची आवड होती. उत्खननामध्ये मण्यांचे व सोन्याचे हार, बांगड्या, अंगठ्या, वाक्या, कमरपट्टा इत्यादी अलंकार मिळाले तसेच नर्तकीचा ब्राँझचा पुतळा मिळाला. तिच्याही हातात बांगड्या व गळ्यात हार आहे.

धर्मकल्पना :

        हडप्पा संस्कृतीत उत्खननात सापडलेल्या विविध मुद्रा, मूर्ती, अग्निकुंड, मृतांना पुरण्याची पद्धत यावरून त्यांच्या धार्मिक कल्पनेची माहिती मिळते. लोकांची प्रामुख्याने शेतीवरती उपजीविका असल्याने लोक भूमातेस मातृदेवता मानत. त्यांच्या धार्मिक जीवनात निसर्गशक्तीस महत्त्वाचे स्थान होते. सूर्य, जल, अग्नी, वृक्ष यांची ते पूजा करत. कालिबंगन येथे सापडलेल्या अग्निकुंडावरून ते अग्निपूजा करत असल्याचे दिसते. निसर्गदेवतेप्रमाणेच पशुपती, नाग, वृषभ म्हणजे बैल यांचीही ते पूजा करत होते. लोक मूर्तिपूजक होते, मात्र हडप्पा संस्कृतीत मंदिरे आढळली नाहीत. तेथील लोक मृतदेहाचे विधिपूर्वक दफन करत. दफन करते वेळी त्यांचे सोबत अलंकार व भांडी ठेवली जात.

भीमाशंकर

                 


                                भीमाशंकर

                                  पुणे जिल्हा्य़ातील हिरव्या रंगात रंगलेला डोंगर,  आसमंत, वाऱ्याच्या तालावर लय धरलेली हिरवीगार भातखाचरं, कडय़ावरून स्वत:ला झोकून देणारे धबधबे आणि धुक्यातून हळूच डोकं वर काढून आपल्याला दर्शन देणारा सह्याद्री! पाऊस सुरू झाला, की कुठल्याही डोंगरवाटेवर येणारा हा अनुभव. केवळ मंत्रमुग्ध करणारा नाही तर समृद्ध करणारा. पण यासाठी कुठे लांब जायची गरज नाही. पुणे-नाशिक महामार्गावरच्या राजगुरुनगरपासून जवळ असंच एक निसर्गनवल लपलंय भोरगिरी! पुण्याहून राजगुरुनगरला गेलं की तिथून चासकमान-वाडा-टोकावडे-शिरगाव या रस्त्याने सुमारे पन्नास किलोमीटरचा टप्पा पार करून भोरगिरी मध्ये दाखल होता येतं. भोरगिरी गावाकडे येतानाच वर उल्लेख केलेली सगळी दृश्य ही भान हरपून टाकणारी असतात. भोरगिरी गावाच्या शेवटी गोलाकार आकाराचा एक डोंगर उभा आहे. अगदी छोटाच पण अद्वितीय निसर्गाने नटलेला भोरगड ! गावातील प्राचीन कोटेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायचं आणि भातखाचरांमधून वाट काढत पाचेक मिनिटात किल्ल्याचा पायथा गाठायचा. किल्ल्याच्या पायथ्यालाच एक छोटासाच पण सुंदर असा एक धबधबा आहे. किल्ल्याच्या उजव्या अंगाच्या डोंगरामध्ये पाहिलं की तिथेही एक धबधबा दिसतो. थोडा मोठा पण बऱ्याचदा गर्दीने गिळंकृत केलेला. आपण त्याला लांबूनच दंडवत घालायचं. भोरगिरी पायथ्याच्या या छोटय़ा धबधब्याजवळच काही कोरीव वीरगळींचे दगड आहेत. ते बघायचे आणि तोल सांभाळत भोरगिरीची प्रशस्त गुहा गाठायची. गुहेत एक शंकराचं मंदिर असून शेजारीच पाण्याचं टाकं दिसतं. गुहेपासून उजवीकडच्या चिंचोळ्या पायवाटेने गेलं की मात्र एका मोठय़ा गुहेत खांबटाकं आढळतं. शंकराचं मंदिर असलेली ही गुहा मुक्कामासाठी अप्रतिमच. गडाच्या माथ्यावरही तुरळक अवशेष असून तिथेही एक चक्कर मारून यायची. पण गडावर जास्त वेळ घालवायचा नाही कारण आता आपला प्रवास सुरू होतोय भीमाशंकरकडे! भोरगिरी-भीमाशंकर हा ट्रेकर्समध्ये प्रसिद्ध असणारा ट्रेक.
भोरगिरी पासून फक्त ६ किलोमीटरवर भीमाशंकरचं प्राचीन देवस्थान आहे. दोन-तीन तासांचा हा प्रवास मात्र शब्दात वर्णन करणं खरोखरच अवघड आहे. गावातून संगतीला एखादं शाळकरी पोर घ्यायचं आणि किल्ला उजवीकडे ठेऊन प्रशस्त पायवाटेने चालू लागायचं. पंधरा-वीस मिनिटांतच निसर्ग तुम्हाला आपल्या कुशीत घेतो आणि सुरू होतो निसर्गाचा अविस्मरणीय सहवास. डावीकडे शेवटपर्यंत असणारी एका नितांत सुंदर अशा एका खळाळत्या ओढय़ाची साथ ही तर आपल्या भ्रमंतीला मिळालेलं सुरेख पाश्र्वसंगीत! आजूबाजूची हिरवाई डोळय़ाचं पारणं फेडते आणि मध्येच समोरून भुर्रकन उडून जाणारा एखाद्या खंडय़ा पक्षी मनावर हलकाच सूर छेडून जातो. त्यात पावसाची एखादी सर आली तर दुधात साखरच! गावातून निघाल्यापासून तासाभरात आपण एका मोठय़ा पठारावर येतो आणि आता भीमाशंकर हाकेच्या अंतरावर राहिलेलं असतं. मग डावीकडच्या त्या जलौघाला अजून काही साथीदार येऊन मिळतात आणि आपल्या आनंदात अजून भर घालतात. ढगांचे कापसासारखे पुंजके मधूनच अंगावर येतात. उजवीकडे एखाद दुसरा धबधबाही साद घालत असतो. त्यात मनसोक्त खेळायचं एखादं लहान मूल होऊन! मन पूर्ण भरलं की पुन्हा पायवाटेवर यायचं आणि आता उदरात शिरायचं ते भीमाशंकाराच्या जटांमध्ये! भीमाशंकर मंदिर जवळ आल्याची जाणीव अस्ताव्यस्त पसरलेला कचराच करून देतो. पर्यटकांची उसळलेली गर्दी आणि त्यात श्वास कोंडलेलं भीमाशंकर.

Tuesday, June 12, 2018

Light of Asia

          .  .  .  .  . Light of Asia. . . .

                          Before the 2500B.C. ago Tathagat Buddha period is called buddhism period. Siddharth is king and also living with all facilities, and empire. But when he realizes the original depth of life related to death,  problem in family. He think about it and finally come to the truth way which is getting a life of tyag marg i. e.  leave the all facilities,   empire and goes to the forest for finding a middle way of life.
                                After the some year and hard work by dhyan sadhana and yog  King Siddharth realize the self power and got a light of knowledge. and king siddharth is convert in to  Buddha.  Many people goes through the way of Buddhism. After the mahanirvaan of buddha many kings of INDIA got dikshaa of Buddhism. Samrat Ashok spread the buddha dhamm all over the India, Shri Lanka, etc. County. And also his child spread the buddh dhamm.  He also made the thousands of Buddha stups all over India. The first education University established in all over world which in India  NALANDA, TKSHASHILA, VIKRAMASHILA.  Student comes in all over the world tk get knowledge of Buddhism and language of PALI.
                               Many kings of world help to spread buddhism in Bharat, Shri Lanka, Nepal, Japan, Bramhadesh, Singapour and up to the Afganistan and Baluchistan the sign if Buddhism identify now. Many caves in Maharashtra, south Indian, Gujarat,  Uttar pradesh, Maddhy pradesh, Bihar, etc. And many in other County. Tathagat buddha said the middle way of life which is very important in now a days.days. And many people get Deekshaa of Buddhism. Because all world know the original way of life is buddha.
             And due to this all world say to tathagat buddha is Light of Asia.
                               

Sunday, June 10, 2018

माळशेज घाट


                             माळशेज घाट

                         हा मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेतील घाट असून येथील परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. हा राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील घाट आहे. सैबेरियातून येणाऱ्या गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात. पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागेल.
हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध व विकसित झाले आहे. प्रामुख्याने पावसाळ्यात पर्यटक येथे गर्दी करतात. जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी च्या बऱ्याच गाड्या पुणे मुंबईहून ये - जा करत असतात.

Thursday, June 7, 2018

महाबळेश्वर


महाबळेश्वर 

                                महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर पाचगणीचा तो निसर्गरम्य परिसर होय. जुने महाबळेश्वर व नवे महाबळेश्वर असे महाबळेश्वराचे दोन भाग करण्यात आले आहेत. मधील भाग ब्रम्हारण्याने व्यापला असून दोन्ही भागंामध्ये ५ कि. मी.चे अंतर आहे.
समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर वसलेले थंड हवेचे ठिकाण व पर्यटनाचे महत्वाचे केंद्र कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गायत्री या पाच नद्या येथून उगम पावतात. या पंचगंगेचे येथे देऊळ आहे. वेण्णा तलावात नौकाविहाराची सोय आहे. वनखात्यातर्फे पर्यटकांसाठी वनसहलीचे आयोजन करण्यात येते. येथील महाबळेश्वराचे देऊळ यादव राजाने तेराव्या शतकात बांधले. अफझल खानाच्या तंबूवरचे कापून आणलेले हे सुवर्ण कळस महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले. विल्सन पॉईंट व माखरिया पॉईंट, केल्स पाँईंट, एको पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, विडो पॉईंट,कसल रॉक व सावित्री पॉईंट, मार्जोरी पॉईंट, एल्फिन्स्टन पॉईंट, कॅनॉट पीक हंटर पॉईंट,नॉर्थकोर्ट पॉईंट, लॉडविक पॉईंट, बॉम्बे पॉईंट, हत्तीचा माथा, चायनामन धबधबा, फाकलेड पॉईंट इ.पॉईंट आहेत. निसर्गाचे विविध रुपे पाहण्यासाठी या ठिकाणी सामान्यापासून ते पदाधिकार्‍यांपर्यंत अनेक व्यक्ती येतात.

*महाबळेश्वरास बालकविनी घिनसर्गदेवतेला पडलेले सुंदर स्वप्नङ असे म्हटले आहे. या ठिकाणी मधुमक्षिका पालन केंद्र आहे. विल्सन पॉईंट जवळच गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. येथे गव्हावरील तांबोरा रोगाचा अभ्यास व संशोधन चालते.

*क्षेत्र महाबळेश्वर
यालाच धोम महाबळेश्वर असेही म्हणतात. येथील एका कड्यावर सर्वात प्राचीन असे हेमांडपंथी शिवमंदिर आहे. त्यात ठेवलेल्या कृष्णेच्या मुर्तीमुळे त्याला कृष्णाबाई मंदिर असेही म्हणतात. याठिकाणी अतिमहाबळेश्वर व महाबळेश्वर ही दोन मोठी शिवमंदिरे बांधलेली आहेत. इ.स. सन १२१५ मध्ये यादव राज्यांनी बांधलेल्या या हेमांडपंथी मंदिराजवळ चंद्रराव मोरे यांनी पंचगंगा मंदिर बांधले त्यात कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या पाच नद्या उगम पावल्या आहेत. या मंदिरामुळेच याला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. एकतपाच्या तीर्थाटनानंतर इ. स. १६४४ साली समर्थ रामदास स्वामींनी सर्व प्रथम येथे येवून धर्मउपदेश देण्यास सुरुवात केली. येथेच त्यांनी पहिले मारुतीचे मंदिर बांधले.

*नवे महाबळेश्वर
कोयना धरणाचा शिवसागर जलाशय व कांदाटी खोर्‍यातील घनदाट जंगलांच्या परिसरात नवे महाबळेश्वर अर्थात जलारण्य प्रकल्प हा खास पर्यावरण दृष्ट्या आकर्षक प्रकल्प विकसित होत आहे.

*विल्सन पॉईंट
महाबळेश्वर मधील महत्वाचा व उंच पॉईंट म्हणजे विल्सन पॉईंट या पॉईंटवर तीन बुरुज आहेत.पहिल्या बुरुजाच्या दक्षिणेकडे पोलोग्राऊंड, मकरंदगड आणि कोयना खोर्‍याचा आसमंत दिसतो. दुसर्‍या बुरुजावर प्रातःकाली आलयास सुर्योदयाचे अप्रतिम दर्शन घडते. तसेच पूर्वेला पाचगणी दिसते. तिसर्‍या बुरुजावरुन उत्तरेकडील क्षेत्र महाबळेश्वर एल्फिस्टन पॉईंट, कॅनॉट पॉईंट, खालचे रांजणवाडी गाव आणि वेण्ण नदीचे खोरे दिल्. पर्यटकांच्या सर्वात आवडत्या पॉईंट पैकी हा एक पॉईंट आहे. अस्ताला जाणा-या सूर्याचे दर्शन हे या पॉईंटचे खास आकर्षण आहे. त्यामुळे सूर्यास्ताच्या अगोदर या पॉईंट जवळ भरपूर गर्दी होते. क्गांच्या संख्येनुसार येथे सूर्य मावळताना त्याचा आकार लंबगोल, घागरीसारखा, चौकोनी, पतंगाकृती असा वेगवेगळा होत असतो. यालाच सनसेट पॉईंट म्हणतात.

*हत्तीचा माथा
याचे अंतर सहा कि.मी. एवढे आहे. पर्वत शिखरांचे हे पश्चिमेकडील सर्वात लांबचे टोक आहे. याची रुंदी ३.७ मीटर असून याची खोली खलच्या कोयना खोर्‍यापर्यंत सुमारे ८०० मीटर इतकी आहे. त्यामुळे या पॉईंटचा आकार हत्तीचा माथा आणि सोंडेसारखा दिसतो. हत्तीच्या माथ्यावरुन खाली पाहिले असता डोळे गरगरतात. समोर प्रतापगड अगदी स्पष्ट दिसतो. तसेच जावलीच्या घनदाट अरण्यात लपलेले जावली गाव दिसते.

*ऑर्थर सीट व विडो पॉईंट
महाबळेश्वरच्या कड्यावरती असलेला ऑर्थर सीट नावाचा सर्वात प्रेक्षणीय असा पाईंट आहे. ऑर्थर मॅलेट याच्या स्मरणार्थ या पॉईंटला हे नाव देण्यात आले आहे. या कड्यावरुन डाव्या बाजूला सावित्रीच्या खोर्‍याचे खोल कडे दिसतात. तर उजव्या बाजूला जोर खोर्‍याचे घनदाट अरण्य दिसते. सर्वत्र खाली दूरवर पर्वत शिखरे दिसतात. तोरणा, रायगड, कांगारी हे किल्ले दिसतात. शिखरे तरंगणार्‍या ढगांनी झाकलेली दिसतात. ऑर्थर सीटकडे जाताना टायगर स्प्रिग नावाचा झारा लागतोयेथे सर्व ऋतुत पाण्याचा प्रवास वाहतो.

महाराष्ट्रातील अभयारण्य


                    महाराष्ट्रातील  अभयारण्य

*दाजीपूर अभयारण्य
कोल्हापूर नगरीच्या राधानगरी तालुक्यातील हे रम्य गाव. अगदी २ ते ३शे. लोकवस्तीचे हे स्थान

*सागरेश्वर अभयारण्य
सांगली जिल्ह्यातही सागरेश्वर हे ठिकाण वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे.

*नागझिरा अभयारण्य
संस्कृत भाषेत नाग या शब्दाचा अर्थ हत्ती असा आहे. फार पूर्वी या जंगलात असलेल्या हत्तींच्या जास्त वास्तव्यामुळे या अभयारण्याला नागझिरा हे नाव पडले असावे असे म्हटले जाते.

*नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य
मोकळ्या आकाशात भरारी घेणारा बहिरी ससाणा...ध्यानस्थ साधूसारखा पाण्यात उभा असलेला बगळा... एरव्ही चटकन न दिसणारा नर्तक, धनेश, करकोचे असे विविध पक्षी इथे मनसोक्त बागडत असतात.

*बोर व्याघ्र प्रकल्प
देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर व्याघ्र प्रकल्पाला लौकिक प्राप्त झाला आहे. आकाराने लहान असला तरी जैवविविधता तसेच वन्यप्राण्यांचा असलेला अधिवास हा प्रत्येक पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.

*कोका अभयारण्य
महाराष्ट्राच्या नकाशावरील अगदी पूर्वेकडच्या कोपऱ्यात असणारा भंडारा जिल्हा. 11 लाखांच्यावर लोकसंख्या असलेला आणि नैसर्गिक सौदर्यासोबतच नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असा हा जिल्हा आहे.

*महाराष्ट्राचे व्याघ्र वैभव
नुकताच जागतिक व्याघ्र दिन साजरा झाला. महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची माहिती देश-विदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचावी, लोकांमध्ये जनजागृती होऊन व्याघ्र संवर्धनास चालना मिळावी आणि महाराष्ट्राचे हे व्याघ्र वैभव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावे या उद्देशाने मंत्रालयात एक दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

*नायगाव अभयारण्य
पहाटे पाच-साडेपाचला या रस्त्यावरून गेलं तर नायगावच्या रस्त्यावर दुतर्फा मोर-लांडोरांच्या जोड्याच जोड्या पहायला मिळतात.

*ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प
स्थानिक आदिवासींचा देव तारू या नावावरून या अभयारण्याला ताडोबा हे नाव प्राप्त झाले.

*नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये वसलेला आहे.

हरिशचंद्र गड


हरिश्चंद्र गड 

                                 हरिश्चंद्र गड हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यात आहे .   साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. १७४७ – ४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.
*पौराणिक महत्व
हरिश्चंद्र, तारामती आणि रोहीदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे.
*ऐतिहासिक महत्व
महाराष्ट्रातील इतर पारंपारिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रितील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे.

*गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

टोलारखिंडीच्या वाटेने गडावर आल्यावर आपण रोहीदास शिखरापाशी पोहचतो. येथून तास-दीड तासात आपण तारामती शिखरापाशी पोहचतो. पायथ्याशीच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे.
*हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर : तळापासून या मंदिराची उंची साधारणतः सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ‘मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ‘चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केला आहे असे स्थानिक गावकरी सांगतात.
‘शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥ हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा ॥’ हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबावर, भिंतीवर आढळतात. श्री चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून ‘तत्वसार’ नावाचा ग्रंथ लिहिला. येथील एका शिलालेखावर, चक्रपाणी वटेश्वरनंदतु । तस्य सुतु वीकट देऊ ॥ अशा ओळी वाचता येतात. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच एक छोटे मंदिर आहे. यातही महादेवाची पिंड आहे. या छोट्या मंदिरासमोरच एक भाग्न अवस्थेतील मूर्ती आहेत. त्यातील पाषाणावर राजा हरिश्चंद्र डोंबाऱ्यांच्या घरी कावडीने पाणी भरत असलेला प्रसंग चित्रित केला आहे.
*केदारेश्वराची गुहा : मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते. याला केदारेश्वराची गुहा असे म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबावर तोलली होती पण सद्यःस्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोलीही आहे. खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते.
*तारामती शिखर : तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. साधारणतः उंची ४८५० फूट. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य आणि सुंदरमुर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजुबाजुला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुख आढळतात. माथ्यावर दोन ते तीन शिवलिंग आढळतात.

*कोकणकडा : कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान. अर्ध्या किलोमीटर परिघाचा, वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळा भिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेव अद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूटा भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणतः ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे.
गडावर चहापाण्याची व जेवणाची सोय होते. पावसाळ्यात मात्र या गडाचे सौंदर्य काही औरच असते. विविधता या गडाएवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही. करवंद, कारावीच्या जाळी, धायटी, उक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकळ, पानफुटी, गारवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात.

Wednesday, June 6, 2018

भंडारदरा


              .  .  .  .  .  भंडारदरा   .  .  .  .  .  .

भंडारदरा हे  अहमदनगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यात वसलेले गाव आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले स्थान असून धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा इथल्या मुळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात. भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. पावसाळ्यामध्ये या भंडारदऱ्याचे एक अनोखे रूप पाहायला मिळते. निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल सोबतच, पांढरे शुभ्र ढग, दाट धुके, पक्ष्यांचे मधुर आवाज, रंगबेरंगी फुलपाखरे, गर्द झाडी आपल्या मनाला तजेला देणारे असते. मनमोकळा श्वास घेण्यास सांगते. धावपळीच्या जीवनातून थोडावेळ निसर्गाच्या सानिध्यात भंडारदरा येथील खालील ठिकाणे तुमची या पावसाळ्यात वाट पाहत आहेत …
*काजवा महोत्सव विशेष आकर्षण
*कळसुबाई शिखर
भंडारदरा परिसरातच कळसुबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वाधिक उंच शिखर आहे. पावसाळ्यामध्ये ट्रेकिंग करण्यासाठी गिर्यारोहकांचे अतिशय आवडीचे ठिकाण आहे. ऐन पावसाळ्यात इथे येणे आणि माथ्यावरच्या पाऊस वाऱ्याच्या खेळात स्वतःला झोकून देणे ही थरारक आणि अविस्मरणीय अनुभूती असते. कळसुबाई शिखराच्या माथ्यावर कळसुबाईचे मंदिर आहे. या शिखरावर चढण्यासाठीची सुरुवात ही बरी गावातून होते. बरी गाव हे भंडादऱ्यापासून ६ किमी अंतरावर आहे. या शिखरावर चढण्यासाठी लोखंडी पायऱ्याचा देखील वापर करू शकतो. कळसुबाई शिखराची उंची १६४६ किमी आहे …
*कसे जाल
मध्यरेल्वेच्या घोटी स्थानकापर्यंत ट्रेनने जाऊ शकता. घोटी स्थानकापासून बरी गावात जाण्यासाठी बस असते. मुंबईपासून १८० किमी व पुण्यापासून ८० किमी अंतरावर हे ठिकाण आहे …
अम्ब्रेला फॉल
विल्सन डॅमवरच एक मोठा गोलाकार धबधबा असून त्याच्या छत्रीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला 'अम्ब्रेला फॉल' असे म्हणतात. धरणाचे आवर्तन सुरु असताना खूप दूरवरुनही अम्ब्रेला फॉल बघता येऊ शकतो. मात्र हा अम्ब्रेला फॉल केवळ जुलै ते ऑक्टोबर महिन्यांतच पहायला मिळतो.
*रंधा फॉल
शेंडी या गावापासून १० किलोमीटर अंतरावर रंधा या गावात एक विशाल धबधबा असून तो गावाच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या हा धबधबा त्यावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच पहायला मिळतो. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो. पावसाळ्यात मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजुने अजून एक धबधबा पहायला मिळतो. दोन्ही धबधबे पूर्ण क्षमतेने वाहत असताना पाहणे हा एक रोमांचित करणारा अनुभव आहे.
*रतनवाडी
भंडारदऱ्याहुन बोटिंगचा आनंद घेत रतनवाडी येथे जाता येते. रतनवाडी येथे अमृतेश्वराचे पुरातन हेमाडपंथी मंदीर आहे. या मंदीरावरील दगडी नक्षीकाम अत्यंत सुबक आणि देखणे असून त्यात मुख्य गाभाऱ्यात एक शिवलिंग आहे, पावसाळ्यात हे शिवलिंग पूर्णत: पाण्यामध्ये बुडालेले असते. रतनवाडी परिसरात अनेक धबधबे असून गळ्यातील हारासारखा दिसणारा 'नेकलेस फॉल' हा विशेष लोकप्रिय आहे.
*घाटघर
शेंडी येथुन पश्चिमेकडे २२ किमीवर घाटघर हे निसर्गसौंदर्याने नटलेले एक गाव आहे. भंडारदरा धरणाच्या कडेकडेने घाटघरपर्यंत करावयाचा प्रवास अतिशय आनंददायी आहे. घाटघर गावचा कोकणकडा अतिशय प्रसिद्ध असून इथुन कोकण आणि सह्याद्री पर्वताचे विलोभनीय दृश्य पहायला मिळते. इथे अनेक धबधबे असून पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर धुक्यात हरविलेला असतो. घाटघरला खूप पाऊस पडतो म्हणून यास नगर जिल्ह्याचे चेरापुंजी असे म्हटले जाते.

प्रागैतिहासिक संस्कृती

        . 

.  .  प्रागैतिहासिक संस्कृती .   .  .    

  .  .   .    .   प्रागैतिहासिक कालखंड हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रारंभ होण्यापूर्वीचा कालखंड होय.  प्रागैतिहासिक कालखंडात पुराणाश्मयुग, नवाश्मयुग, धातुयुगाचा अंतर्भाव होतो . या युगालाच अश्मयुगीन कालखंड म्हणतात.

* पुराणाश्मयुग (इ. स. पूर्व ५०, ०००-२०, ०००)
                          याचे अवशेष महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, वायव्य भारत येथे आढळतात. हे जीवन पशुतुल्य     होते .

* मध्यपाषाण युग(इ. स. पूर्व २०, ०००-९०००)
                 .        याचे अवशेष राजस्थान, मध्य प्रदेश या ठिकाणी आढळतात. हा अश्मयुगीन संस्कृतीचा पुढील टप्पा होता . या काळात शिकार, पशुपालन वर भर दिला गेला .

* नवाश्मयुग (इ. स. पूर्व  ९०००-५०००)
                       या युगाचे पुरावे राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, काश्मीर, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, आसाम येथे आढळतात. शेती , पशुपालन, ग्रामीण जीवनाचा उदय या कालावधीत झाला .

* धातुयुग/ताम्रपाषाणयुग(इ. स. पूर्व ५०००-१०००)
                                       याच कालखंडात भारतात वैभवशाली सिंधू व आर्य संस्कृतीचा उदय झाला . या कालखंडाचे अवशेष सिंधू खोरे (पाकिस्तान ), वायव्य भारत, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पूर्व पंजाब (पाकिस्तान ), गोदावरी खोरे , राजपुताना, सौराष्ट्र, महाराष्ट्र, कर्नाटक येथे आढळतात.
या संस्कृत शेती , व्यापार, उद्योग, व्यवसाय, दळणवळण, धर्म संकल्पना, कुटुंब संस्था , प्रशासन विकसित झाल्याने मानवाची प्रगती झाली .

Monday, June 4, 2018

अंकाई किल्ले

              

.  .  .  . अंकाई किल्ले  .  .  .  

आकर्षण :- अंकाई किल्ले  ,  बौद्ध लेणी,‌जैन लेणी ,  हिरवे उंच डोंगर,  पाण्याचे कुंड.

ठिकाण : अंकाई,  ता.  येवला ,  जि.  नाशिक
              महाराष्ट्र

भेट; -  आॅगस्ट- जानेवारी

मार्ग :- शीरडी  पासून 50किमी अंतर,  नाशिक पासून 70किमी. 

                             अंकाई किल्ले हि अतीशय पौराणिक वास्तू आहे . येथे पाण्याचे कुंड आहे .  किल्ले वर जाण्यासाठी पायरी आहे .  येथील हिरवा निसर्ग पर्यटकांनासादर घालतो . किल्लेवर ऐतिहासिक वाडा आहे . विश्रांती साठी पायथ्याशी आश्रम आहे . 
                       तर मग या पावसाळ्यात  नक्की भेट द्या . . . . .