Thursday, June 7, 2018

महाबळेश्वर


महाबळेश्वर 

                                महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर पाचगणीचा तो निसर्गरम्य परिसर होय. जुने महाबळेश्वर व नवे महाबळेश्वर असे महाबळेश्वराचे दोन भाग करण्यात आले आहेत. मधील भाग ब्रम्हारण्याने व्यापला असून दोन्ही भागंामध्ये ५ कि. मी.चे अंतर आहे.
समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर वसलेले थंड हवेचे ठिकाण व पर्यटनाचे महत्वाचे केंद्र कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गायत्री या पाच नद्या येथून उगम पावतात. या पंचगंगेचे येथे देऊळ आहे. वेण्णा तलावात नौकाविहाराची सोय आहे. वनखात्यातर्फे पर्यटकांसाठी वनसहलीचे आयोजन करण्यात येते. येथील महाबळेश्वराचे देऊळ यादव राजाने तेराव्या शतकात बांधले. अफझल खानाच्या तंबूवरचे कापून आणलेले हे सुवर्ण कळस महाबळेश्वर मंदिरास अर्पण केले. विल्सन पॉईंट व माखरिया पॉईंट, केल्स पाँईंट, एको पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, विडो पॉईंट,कसल रॉक व सावित्री पॉईंट, मार्जोरी पॉईंट, एल्फिन्स्टन पॉईंट, कॅनॉट पीक हंटर पॉईंट,नॉर्थकोर्ट पॉईंट, लॉडविक पॉईंट, बॉम्बे पॉईंट, हत्तीचा माथा, चायनामन धबधबा, फाकलेड पॉईंट इ.पॉईंट आहेत. निसर्गाचे विविध रुपे पाहण्यासाठी या ठिकाणी सामान्यापासून ते पदाधिकार्‍यांपर्यंत अनेक व्यक्ती येतात.

*महाबळेश्वरास बालकविनी घिनसर्गदेवतेला पडलेले सुंदर स्वप्नङ असे म्हटले आहे. या ठिकाणी मधुमक्षिका पालन केंद्र आहे. विल्सन पॉईंट जवळच गहू गेरवा संशोधन केंद्र आहे. येथे गव्हावरील तांबोरा रोगाचा अभ्यास व संशोधन चालते.

*क्षेत्र महाबळेश्वर
यालाच धोम महाबळेश्वर असेही म्हणतात. येथील एका कड्यावर सर्वात प्राचीन असे हेमांडपंथी शिवमंदिर आहे. त्यात ठेवलेल्या कृष्णेच्या मुर्तीमुळे त्याला कृष्णाबाई मंदिर असेही म्हणतात. याठिकाणी अतिमहाबळेश्वर व महाबळेश्वर ही दोन मोठी शिवमंदिरे बांधलेली आहेत. इ.स. सन १२१५ मध्ये यादव राज्यांनी बांधलेल्या या हेमांडपंथी मंदिराजवळ चंद्रराव मोरे यांनी पंचगंगा मंदिर बांधले त्यात कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या पाच नद्या उगम पावल्या आहेत. या मंदिरामुळेच याला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. एकतपाच्या तीर्थाटनानंतर इ. स. १६४४ साली समर्थ रामदास स्वामींनी सर्व प्रथम येथे येवून धर्मउपदेश देण्यास सुरुवात केली. येथेच त्यांनी पहिले मारुतीचे मंदिर बांधले.

*नवे महाबळेश्वर
कोयना धरणाचा शिवसागर जलाशय व कांदाटी खोर्‍यातील घनदाट जंगलांच्या परिसरात नवे महाबळेश्वर अर्थात जलारण्य प्रकल्प हा खास पर्यावरण दृष्ट्या आकर्षक प्रकल्प विकसित होत आहे.

*विल्सन पॉईंट
महाबळेश्वर मधील महत्वाचा व उंच पॉईंट म्हणजे विल्सन पॉईंट या पॉईंटवर तीन बुरुज आहेत.पहिल्या बुरुजाच्या दक्षिणेकडे पोलोग्राऊंड, मकरंदगड आणि कोयना खोर्‍याचा आसमंत दिसतो. दुसर्‍या बुरुजावर प्रातःकाली आलयास सुर्योदयाचे अप्रतिम दर्शन घडते. तसेच पूर्वेला पाचगणी दिसते. तिसर्‍या बुरुजावरुन उत्तरेकडील क्षेत्र महाबळेश्वर एल्फिस्टन पॉईंट, कॅनॉट पॉईंट, खालचे रांजणवाडी गाव आणि वेण्ण नदीचे खोरे दिल्. पर्यटकांच्या सर्वात आवडत्या पॉईंट पैकी हा एक पॉईंट आहे. अस्ताला जाणा-या सूर्याचे दर्शन हे या पॉईंटचे खास आकर्षण आहे. त्यामुळे सूर्यास्ताच्या अगोदर या पॉईंट जवळ भरपूर गर्दी होते. क्गांच्या संख्येनुसार येथे सूर्य मावळताना त्याचा आकार लंबगोल, घागरीसारखा, चौकोनी, पतंगाकृती असा वेगवेगळा होत असतो. यालाच सनसेट पॉईंट म्हणतात.

*हत्तीचा माथा
याचे अंतर सहा कि.मी. एवढे आहे. पर्वत शिखरांचे हे पश्चिमेकडील सर्वात लांबचे टोक आहे. याची रुंदी ३.७ मीटर असून याची खोली खलच्या कोयना खोर्‍यापर्यंत सुमारे ८०० मीटर इतकी आहे. त्यामुळे या पॉईंटचा आकार हत्तीचा माथा आणि सोंडेसारखा दिसतो. हत्तीच्या माथ्यावरुन खाली पाहिले असता डोळे गरगरतात. समोर प्रतापगड अगदी स्पष्ट दिसतो. तसेच जावलीच्या घनदाट अरण्यात लपलेले जावली गाव दिसते.

*ऑर्थर सीट व विडो पॉईंट
महाबळेश्वरच्या कड्यावरती असलेला ऑर्थर सीट नावाचा सर्वात प्रेक्षणीय असा पाईंट आहे. ऑर्थर मॅलेट याच्या स्मरणार्थ या पॉईंटला हे नाव देण्यात आले आहे. या कड्यावरुन डाव्या बाजूला सावित्रीच्या खोर्‍याचे खोल कडे दिसतात. तर उजव्या बाजूला जोर खोर्‍याचे घनदाट अरण्य दिसते. सर्वत्र खाली दूरवर पर्वत शिखरे दिसतात. तोरणा, रायगड, कांगारी हे किल्ले दिसतात. शिखरे तरंगणार्‍या ढगांनी झाकलेली दिसतात. ऑर्थर सीटकडे जाताना टायगर स्प्रिग नावाचा झारा लागतोयेथे सर्व ऋतुत पाण्याचा प्रवास वाहतो.

2 comments: