Sunday, June 10, 2018

माळशेज घाट


                             माळशेज घाट

                         हा मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेतील घाट असून येथील परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. हा राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील घाट आहे. सैबेरियातून येणाऱ्या गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात. पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागेल.
हे ठिकाण पर्यटनाच्या दृष्टीने प्रसिद्ध व विकसित झाले आहे. प्रामुख्याने पावसाळ्यात पर्यटक येथे गर्दी करतात. जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटी च्या बऱ्याच गाड्या पुणे मुंबईहून ये - जा करत असतात.

No comments:

Post a Comment